शहादा येथे संविधान रॅलीसह प्रबोधनात्मक व्याख्यान जनजागृती कार्यक्रम संपन्न. ; महाराष्ट्रातील पहिली संविधान रॅली संपन्न
शहादा येथे संविधान रॅलीसह प्रबोधनात्मक व्याख्यान जनजागृती कार्यक्रम संपन्न. ; महाराष्ट्रातील पहिली संविधान रॅली संपन्न संपादक विजय पाटील शहादा (प्रतिनिधी) भारतीय संविधान हे सर्वांना समान न्याय, अधिकार व हक्क बहाल करणारे आहे.मात्र सध्याचे केंद्रातील सरकार हे संविधान मोडून काढण्यासाठी छुपा अजेंडा राबवत आहे. सर्वांना समतेचा संदेश देणारे संविधाना ऐवजी मनुस्मृतीवर आधारीत संविधानाचा ढाचा मोदी सरकारने तयार केला आहे.मनुस्मृतीचे पुनरूज्जीवन करण्याचा बेत वेळीच हाणून पाडण्यासाठी तयार रहा, असे आवाहन रायगड येथील सर्वहारा जनआंदोलनाच्या प्रमुख श्रीमती उल्काताई महाजन यांनी केले आहे. शहरातील प्रांताधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात त्या मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, धडगाव पंचायत समितीच्या सदस्या नीमाताई पटले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, माजी उपनगरा...