शिरपूर शहर पो. स्टे च्या शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी..... नटवाडे शिवारातील गांजाचे शेतावर कारवाई करुन एकूण ५,८६,६००/-रुपये किंमतीचा २९३.३०० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त....
शिरपूर शहर पो. स्टे च्या शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी.....
नटवाडे शिवारातील गांजाचे शेतावर कारवाई करुन एकूण ५,८६,६००/-रुपये किंमतीचा २९३.३०० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त....
शिरपुर (प्रतिनिधी) शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली असून नटवाडे शिवारातील गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडी जप्त केली आहेत.दि.०२/०५/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, नटवाडे शिवारात इसम नामे हरचंद जोगी पावरा रा. नटवाडे ता. शिरपुर जि.धुळे याने त्याचे ताब्यातील वन जमीनीवरील शेतात गांजा (अंमली पदार्थ) ची लागवड करून बेकायदेशीररित्या शेती करीत आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी सदर बातमीची माहिती मा. पोलीस अधीक्षक, धुळे, मा. अपर
पोलीस अधीक्षक, धुळे यांना कळवून छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी राजपत्रित अधिकारी श्री रविंद्र कुमावत नायब तहसीलदार शिरपूर, दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच शिरपूर शहर पो स्टे चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३ वरील सुळे फाट्याचे पुढे नटवाडे ता. शिरपूर जि. धुळे शिवारात जाऊन शोध घेऊन १९.५५ वाजेच्या सुमारास इसम नामे हरचंद जोगी पावरा रा. नटवाड़े ता. शिरपूर जि. धुळे याचे वनजमिनीचे शेतात छापा टाकला असता त्या शेतात भुईमुगाचे पिकात टिकटिकाणी गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतींच्या झाडांची लागवड करुन शेती केलेली दिसली. सदर इसम शेतात मिळून आला नाही. त्याचे शेतात मिळून आलेल्या एकूण ५,८६,६००/- रुपये किंमतीचे २९३.३०० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करुन त्याचे विरुद्ध पोहेकॉ / ६०३ ललित पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउप निरी. किरण बान्हे करीत असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपीताचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक . संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर तथा पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे प्रभारी . ए. एस. आगरकर, पोउनि / किरण बान्हे, पोउप निरी. गणेश कुटे, पोहकों/ ललित पाटील, पोकों/ योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, विनोद अखडमल, गोविंद कोळी, मुकेश पावरा, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंखे, उमाकांत वाघ, होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी, राम भिल व भाऊसाहेब टाकूर अशांनी मिळून केली आहे.
Comments
Post a Comment
No