लोकशाहीत जनजागृतीसाठी पत्रकारिता महत्वपूर्ण माध्यम -उद्योगपती नूहभाई नुरानी
लोकशाहीत जनजागृतीसाठी पत्रकारिता महत्वपूर्ण माध्यम -उद्योगपती नूहभाई नुरानी
शहादा ::---
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेस विविध घटना घडामोडींची माहिती जशीच्या तशी पोहोच करता येते. लोकशाहीत पत्रकारिता जनजागृतीचे सशक्त माध्यम आहे. राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी पत्रकार महत्त्वाचा दुवा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती नूहभाई नुरानी यांनी केले.
लोणखेडा ता. शहादा येथील नूरानी परिवाराच्या वतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे पत्रकार बांधवांसाठी आयोजन केले होते. यावेळी झालेल्या छोट्याखानी समारंभात श्री.नुराणी बोलत होते.
श्री.नुराणी म्हणाले, मैत्री-बंधुभाव व स्नेहवाढीचा संदेश देणारा रमजान महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव व अनेक जण दररोज उपवास ठेवतात. शरीरशुद्धी व मनशुद्धीसाठी या पवित्र महिन्यात रोजा ठेवण्यात येतो. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने स्नेह व बंधुभावात वाढ होत असते.ते म्हणाले, लोकशाहीत पत्रकार व पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. घटना घडामोडींबाबत व्यवस्थीत संकलन करून समाजापावेतो पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडतात. पत्रकारांनाही हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेची गरज असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जेष्ठ प्रा.दत्ता वाघ, संजय राजपूत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरकारी वकील अँड.जसराज संचेती, माजी शिक्षण सभापती ज्ञानेश्वर चौधरी,दानीश नुरानी, सुनील सोमवंशी, लोटन धोबी, ईश्वर पाटील, हिरालाल रोकडे,प्रा.डी.सी.पाटील, बापू घोडराज, जगदीश जयस्वाल, चंद्रकांत शिवदे, गिरीधर मोरे,
विजय पाटील, संतोष जवेरी, हर्षल सोनवणे, नितीन साळवे, विजय निकम, योगेश सावंत, कमलेश पाटील, हर्षल साळुंखे, , प्रा.अबरार खान, यांच्यासह विविध चॅनल,युट्युब, दैनिकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झालेल्या दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी रुपेश जाधव यांचा प्रतिनिधी स्वरूपात सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.आभार प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी मानले.
Comments
Post a Comment
No