लग्न समारंभात प्री वेडिंग पूर्णपणे बंद..लेवे गुर्जंर समाजात तीन महत्त्वपूर्ण ठरावावर निर्णय

 *लग्न समारंभात प्री वेडिंग पूर्णपणे बंद..लेवे गुर्जंर समाजात तीन महत्त्वपूर्ण ठरावावर निर्णय


बलवाड़ी प्रतिनिधी आशीष चौधरी 

 दि.८ एप्रिल २०२३ शनिवार रोजी रावेर येथे लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली लेवे गुजर समन्वय समिती (रावेर,मुक्ताईनगर,बुरहानपुर, एरोंडोल विभाग) तर्फे गुजर समाजाच्या बंधु भगिनींची जिल्हास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत रावेर,मुक्ताईनगर व बुरहानपुर, एरोंडोल तालुक्यातील प्रत्येक गावातील गुजर समाज मंडळाचे प्रतिनीधी व समाज बांधवांसह जिल्ह्यातील समाज बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी समाजातील लग्न विधी कार्यक्रम, शैक्षणिक कार्य , मरणातील विधीवत कार्य या विषयावर सुमारे तीन तास चर्चा झाली.सभेतील चर्चेअंती *तीन ठराव* पारीत करण्यात आले. त्यात

*१) प्री वेडिंग पूर्णपणे बंद...*

*२)लग्नात तृतीयपंथी(नाचा) नाचवण्यावर पूर्णपणे बंदी....*

*३) जानोसा ठिकाणी पोहा किंवा नास्ता ठेवण्यास मनाई.*

      वरील ठरावास सर्व उपस्थितांनी मोठ्या आवाजात टाळ्यांच्या गजरात हात वर करुन अनुमोदन दिले. 

संम्मत झालेल्या ठरावाचे उल्लंघन होणार नाही व अबंलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक गावात स्थापन करण्यात आलेल्या गुजर मंडळांनी महीला व पुरुषांची  सभा घेऊन  सुचना करण्यात याव्यात असे ही ठरले.

Comments