अक्कलकुवा येथे बिबट्याच्या हल्यात ९ वर्षीय बालक ठार
अक्कलकुवा येथे बिबट्याच्या हल्यात ९ वर्षीय बालक ठार
नंदुरबार (विजय पी पाटील)
अक्कलकुवा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुनर्वसन शिवारातील शेतात घरातील अंगणात जेवण करणाऱ्या नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने उचलून नेत जवळच्या शेतात ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 4 रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात सुरेश भाईदास वसावे हा नऊ वर्षीय बालक जेवण करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने सुरेश वर हल्ला करुन त्यास जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात नेऊन गंभीररित्या जखमी केल्याने त्यामुळे बालकाचा जागेवरच मृत्यू झाला. सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर लचके तोडून जागीच ठार केले. बिबट्याने सदर मुलाच्या शरीरातील पूर्ण रक्त पिऊन घेतल्याने शरीर कोरडे पडले होते.
दरम्यान मुलाच्या काकूने आरडा ओरड करून सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल डी गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा शोध घेतला घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा करून सदर बालकास शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष परमार यांनी शव विच्छेदन केले. आमदार आमश्या पाडवी यांनी पुर्ण घटना स्थळाची पाहणी करुन अधिकारी व मुलाच्या पालकांसह ग्रामिण रुग्णालय गाठले तेथे वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व वन अधिकाऱ्यां सोबत आवश्यक चर्चा करुन मुलाच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना दिल्या.



Comments
Post a Comment
No