संघटीत होवूया! परिवर्तन करुया! आदर्श समाज घडवूया*

 संघटीत होवूया! परिवर्तन करुया!       आदर्श समाज घडवूया*



बलवाड़ी प्रतिनिधी:– आशीष चौधरी

                 वाघोदा बु. दि.२१/०४/२०२३ वार शुक्रवार रोजी श्रीकृष्ण मंदिर येथे संध्याकाळी गावातील समाज बांधवांची "#गुजर समाज सभा" पार पडली,यात समाजातील लग्न सोहळ्यात सुरु असलेल्या अनिष्ट व खर्चिक प्रथा व चाली-रिती यावर चर्चा करून समाजातर्फे समाजहितासाठी विविध विषयांवर  निर्णय घेऊन ठराव करण्यात आले,ते खालीलप्रमाणे...

१) लग्नसोहळ्याअगोदर होणारे प्री-वेंडीग व फोटोशूट यावर बंदी घालण्यात आली आहे.

२) लग्नातील वांजत्रीत(बॅंन्डमध्ये) तृतीयपंथी नाचवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

३) लग्नातील जानोसा पध्दतीत नाश्ता बंद करण्यात आला.(चहा,थंडपेय ठेवण्यास मुभा राहिल.)

४) मेहंदी कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.

५)वधु(मुलीच्या) हळदिच्या संध्याकाळच्या शेवभाजी कार्यक्रमावर बंधन घालण्यात आले आहे.(यात भाऊबंदकि,वाड्यातील,जवळचे नातेवाईक यांनाच आमंत्रित करण्यास मुभा देण्यात आली आहे.)

६) वराच्या(मुलांच्या) हळदीच्या संध्याकाळच्या शेवभाजी कार्यक्रमावर बंधन घातले असून भाउबंदकि,नातेवाईक व मित्र वगळता जेवणाचे आमंत्रण देऊ नये.

(गावळ नसल्यास तसेच वाळण्याचा कार्यक्रम लहान स्वरूपाचा असल्यास,गावातील समाज बांधवांचा जेवणाचा कार्यक्रम करू इच्छित असलेल्यांनी हळदिच्या दिवशी सकाळचा जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.) 

७)लग्न लागून गावात आल्यावर वधु-वराची स्वागत मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

८)आपण न्हावी मार्फत आमंत्रण देत असल्याने  गावातील व्याही वगळता समाज बांधवांना लग्नपत्रिका देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

९)  ज्या समाज बांधवाकडे लग्नसोहळा असेल त्यांची कमीत-कमी ५०१ रु.गुजर मंडळाची देणगी पावती घेण्याचे ठरविण्यात आले.(ही देणगी समाज कल्याण तसेच गरजू समाजबांधवासाठी मंडळार्फे वेळोवेळी निर्णय घेऊन वापरण्यात येईल.)

  १०) वरील झालेल्या ठरावांतील निर्णय तसेच नियम-अटी समाजहिताच्या असून समाजाला मान्य आहेत म्हणून या ठरावांमधील निर्णय तसेच नियम-अटी प्रत्येक समाज बांधवाने पाळणे बंधनकारक आहेत अन्यथा समाजाकडून लग्न सोहळ्यासाठी सहकार्य व सोहळ्यात सामील होण्याची अपेक्षा बाळगू नये हे ठरविण्यात आले. 

       यावेळी गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून सभेच्या शेवटी आदर्श समाज घडविण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने प्रतिज्ञा घेण्यात आली.

Comments