नंदुरबार राज्य उत्पादन- शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून ९ लाख ७२ हजार रुपयांचा परराज्यातील मद्यसाठा केला जप्त
नंदुरबार राज्य उत्पादन- शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून ९ लाख ७२ हजार रुपयांचा परराज्यातील मद्यसाठा केला जप्त
नंदुरबार (प्रतिनिधी)अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथे राज्य उत्पादन- शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गावात छापा टाकून ९ लाख ७२ हजार रुपयांचा परराज्यातील मद्यसाठा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे.
नवापाडा ता. आक्कलकुवा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी. एम.चकोर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहिती वरुन नवापाडा शिवार ता.आक्कल्कुवा या ठिकाणी कुडाची झोपडीत अवैध दारु साठा असल्याची माहिती वरुन छापा टाकला असता तेथे टयुबर्ग स्ट्रॉंग बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण ३०० बॉक्स मध्ये ७२०० पत्री टीन जे हिमाचल प्रदेश निर्मित व हरीयाणा राज्यात विक्रीस असलेले. असे मुद्देमाल मिळून आला. सदर एकूण रु. रू.९,७२,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४५ अंतर्गत करण्यात आली.
सदरची कार्यवाही डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रा.उ.शु. भरारी पथकं नंदुरबार, बी. एस. महाडीक निरीक्षक रा.उ.शु. नंदुरबार एस. आर. नजन दुय्यम निरीक्षक, सागर इंगळे दुय्यम निरीक्षक नंदुरबार प्रशांत एस. पाटील दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. नंदुरबार जवान हितेश जेठे, संदिप वाघ, एम. के. पवार सहा. दु. निरीक्षक, रामसिंग राजपुत सहा. दु. निरीक्षक मानसिंग पाडवी, धनराज पाटील, हेमंत पाटील, संजय बैसाणे, राहुल साळवे यांनी केली.
सदर गुन्हयाचा तपास डी.एम.चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.
Comments
Post a Comment
No