मोठा वाघोदा- सावदा रस्त्यावर रात्रीच्या वेळेस चालत्या ट्रकने घेतला पेट. सुदैवाने जीवितहानी टळली
*द बर्निंग ट्रक*
मोठा वाघोदा- सावदा रस्त्यावर रात्रीच्या वेळेस चालत्या ट्रकने घेतला पेट. सुदैवाने जीवितहानी टळली
बलवाड़ी प्रतिनिधी:– आशीष चौधरी
रावेर तालुक्यातील अंकलेश्वर -बुर्हानपुर महामार्गावरील मोठा वाघोदा बु सावदा रस्यादरम्यान रस्त्यावर श्रीकृष्ण पेट्रोल पंप जवळ गुरुवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ताग भरून जाणार्या चालत्या आयशर वाहनाला अचानक आग लागली.यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.त्या वाहना मध्ये धागा (दोरा) होता ते वाहन बुरहानपुर येथे दोऱ्याचे बंडल घेवून जात असल्याचे माहिती समोर येत आहे.तसेच सदर वाहनास आग लागल्याचे समजताच ड्राइवर ने गाडी थांबवुन उडी घेतली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असता सावदा येथील अग्नीशामक दलाकडुन आग विझवण्यासाठी बंब मागविण्यात
आले पण एका बंबानेही आग आटोक्यात येत नव्हती.तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी दुसरा बंब ही मागवण्यात आला होता.वाहनाला आग कशा मुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी वाघोदा येथील गावकरी मात्र रात्रीच्या वेळेस धावून आले होते.
Comments
Post a Comment
No