शहादा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

 शहादा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...


.
 

शहादा (विजय पी पाटील)

शहादा येथील महात्मा फुले चौकातील क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फूले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या  जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.  यावेळी सकाळी 8 वाजेपासुन ते संध्याकाली उशीरा पर्यंत महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर  आले होते .या अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी महात्मा जोतीराव फूले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की आजच्या तरुणाईने महात्मा फुले यांची पुस्तके वाचली पाहिजे त्यांनी आपल्या पुस्तकात आजच्या पिढ़ीला एक संदेश दिला आहे शेतकरीवर्गासाठी पाणी बचत कशी करावी यासाठी त्यांनी आधीच उपयोजना केल्या होत्या . जोतीराव फूले यांनी त्यांच्या पुस्तकात खुप काही शिकण्यासारखे लिहिले आहे म्हणून त्यांची लिहलेली पुस्तके आजच्या पिढ़ीने नक्कीच वाचली पाहिजे असे मत त्यांनी या कार्यक्रमां प्रसंगी व्यक्त केले.    

कार्यक्रमास शहादा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजनमोरे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील , भाजप जेष्ठ नेते कांतिलाल टाटिया , माजी सभापती तथा जि प सदस्य अभिजीत पाटील,आर पीआय जिल्हा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, प्रा मकरंद पाटील, जि प सदस्य मोहन शेवाळे,  समता परिषद नंदूरबार जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वाघ, जयनगर हेरंब ट्रस्ट चे अध्यक्ष हिरालाल माळी,बापू माळी,पंडित नाना जाधव, समता परिषद नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे,पी जी पाटील, समता परिषद शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी, रमाशंकर माळी, विष्णु जोंधळे  अनिल भामरे, सी डी बोढरे , अजय शर्मा, के डी पाटील, भास्कर देवरे,  रेशमा पवार, अलका जोंधलळे,रोहन माळी,रविन्द्र माळी,ईश्वर वारुडे, काशीनाथ महाजन, ईश्वर माळी , विजय  माळी, सी एम माळी, राष्ट्रवादी शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर ,मनोज माळी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते .या अभिवादना प्रसंगी महात्मा फुले चौक   जय  ज्योती, जय क्रांति या घोषणांनी दुमद्दुमले होते.

Comments