सृजनशील व्यक्तिमत्व कार्य कुशल संघटक श्री एन व्ही पाटील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सृजनशील व्यक्तिमत्व कार्य कुशल संघटक श्री एन व्ही पाटील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
रावेर (श्री.व्ही.टी.चौधरी सर)शिक्षण संघटना, समाज, सहकार व सर्वच क्षेत्रात सहभाग घेऊन कृतीला प्राधान्य देणारे, कोणतेही काम झाल्याशिवाय चैन न पडणारे ,दुसऱ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागणारे, लोक संग्रह वृत्तीचे, 'आधी केले मग सांगितले 'या युक्तीचे उपासक म्हणजे बलवाडी या लहानशा गावात माजी आमदार बाजीराव नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री बाजीराव नाना पाटील विद्यालयाचे कुशल प्रशासक श्रीयुत एन व्ही पाटील हे 14 मे 2023 रोजी वयाची 53 वर्षे पूर्ण करून 54 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत .
शिक्षण सहकार संघटना इत्यादी क्षेत्रात काम करीत असताना अनेकांची मने सांभाळावी लागतात ,त्याचप्रमाणे नवीन कार्य करण्याची प्रेरणा देणे इतके सामर्थ्य व विद्वत्ता नेतृत्व करणाऱ्याजवळ असावी लागते, भाषा सामर्थ्य ,अनुभवाची समृद्धता व आत्मविश्वास या गुणांनी सरांचे व्यक्तिमत्व नटलेले असल्याने विविध सामाजिक व शिक्षकांशी संबंधित संस्थांवर सर यशस्वीपणे काम करीत आहेत. संस्थापक संचालक रावेर तालुका माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था, रावेर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष,ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य ,रावेर तालुका गुर्जर समाज गुणगौरव समितीचे अध्यक्ष अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी त्यांनी केलेली आहे.
"मुख्याध्यापक संघ" महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य करणारा संघ आहे. तो प्रगतीपथावर राहण्यासाठी संघटनेचे उपक्रम व कार्याची माहिती व्हावी म्हणून जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संपादक व प्रसिद्ध प्रमुख पदाची धुरा सरांनी यशस्वीपणे सांभाळली.
विद्यालय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,शिक्षक पालक चालक या सर्वांच्या सहकार्याने विविध प्रकारचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम सर राबवत असतात. चांगला विचार स्फुरला की लगेच कृतीत आणावा अशी आस धरणारे ,नियोजन चातुर्य निष्कलंकता, विद्वत्ता या गुणवैशिष्ट्यांमुळे आदर्श अशा व्यक्तींची कमी असणाऱ्या समाजात सरांसारखे व्यक्ती समाजाला प्रकाश दाखवत असतात ,तो उजेड आपण उघड्या डोळ्यांनी बघितला पाहिजे . जिद्द ,आत्मविश्वास उत्तम व्यवस्थापन हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत." इरादे ने खो तो सपने साकार होते है" यश समृद्धी व सार्थकतेचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहावा .
आपल्या कर्तुत्वाचा जनमानसात ठसा उमटत राहो ,कीर्तीवंत व्यक्तिमत्वास चिरायू आयुष्य लाभो हीच मुख्याध्यापक एन व्ही पाटील सर यांना 54 व्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment
No