लोणखेडा -पुरुषोत्तम नगर रस्त्यावर मोटरसायकलींची समोरासमोर धडक,चार शाळकरी मुले गंभीर जखमी

 लोणखेडा -पुरुषोत्तम नगर रस्त्यावर मोटरसायकलींची समोरासमोर धडक,चार शाळकरी मुले गंभीर जखमी




नंदुरबार (प्रतिनिधी)

  जिल्ह्यातील  शहादा तालुक्यातील लोणखेडा ते पुरुषोत्तम नगर कारखाना रस्त्यावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मोटरसायकल क्रमांक MH-39-D-5175 व मोटरसायकल क्रमांक MH -39-M-7291या दोन मोटरसायकली भरधाव वेगाने समोरासमोर धडक झाल्याने ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या चार जण शाळकरी मुले आहेत त्यात एक जण गोपी चव्हाण रा.वाघर्डे,पवन चव्हाण रा. चिरखान, अशी नावे असल्याचे समजते . अपघात होताच  नागरिकांनी जखमींना तात्काळ  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Comments