मौजे- मोहीदा तश येथे मिरची पिकावरील शेती शाळा कार्यक्रम संपन्न
मौजे- मोहीदा तश येथे मिरची पिकावरील शेती शाळा कार्यक्रम संपन्न
विजय पी पाटील,नंदुरबार
मौजे- मोहीदा तश येथे मिरची पिकावरील शेती शाळा कार्यक्रम संपन्न
शहादा तालुक्यातील मौजे मोहिदा तश येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत मूल्य साखळी विकास शाळा कार्यक्रमांतर्गत मिरची पिकाची शेती शाळेचा वर्ग घेण्यात आला.सदर शेती शाळे मध्ये हेरंब गणेश शेतकरी उत्पादक कंपनी लि. वडाळी अंतर्गत मोहिदा तश येथे श्री नंदलाल नरोत्तम पाटील च्या शेतावर शेती शाळेचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर शेती शाळेमध्ये मूल्य साखळीतज्ञ श्री उमाकांत पाटील कृषी तज्ञ गोविंद पाटील जैन इरिगेशनचे सुदर्शन गवंडे कृषी सहाय्यक श्रीमती मनीषा कोळी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव उपस्थित होते .
मुल्य साखळी तज्ञ उमाकांत पाटील यांनी स्मार्ट योजनेबाबत व शेती शाळेचा उद्देश व शेती शाळा अंबलबजावणी बाबतची माहिती दिली. जैन इरिगेशनचे कृषि तज्ञ गोविंद पाटील यांनी मिरचीचे खत व्यवस्थापन बाबत माहिती दिली. तसेच तसेच सुदर्शन गवंडे ठिबक सिंचना बाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी सहायक श्रीमती मनीषा कोळी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांनी शेती शाळा शेतकऱ्यांचा सांख्यिक खेळ घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास हेरंब गणेश शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक व सभासद भाऊ पाटील, रामदास पाटील , कांतीलाल पाटील , प्रमोद पाटील , पुरुषोत्तम पाटील, राजेद्र पाटील इ शेतकरी उपस्थित होते .
Comments
Post a Comment
No